Posts

Showing posts from March, 2019
माझे पप्पा एवढे काम दिवसभर तुम्ही करता, रात्रंदिवस आमची काळजी तुम्हाला. आम्ही काय करतो? आई काय करते? काही कमी तर पडत नाही आम्हाला? नेहमी याची चिंता तुम्हाला. दिवसभर उन्हात काम करून येता तुम्ही, स्वतःचा विचार न करता विदुषका प्रमाणे येता तुम्ही. स्वतःला कितीही दुःख झाले, स्वतःला कधीही वाईट  वाटले, कधीच कळायला देत नाही आम्हाला. काम जरी नसले, पैसे जरी संपले, न कळवता पाहिजे ते आणून दिले आम्हाला. कधी कधी रागाने खूप काही बोलता, मनाला वाईट वाटते पण समजू शकते मी आम्हाला दूःखवायचे नसते तूम्हाला. म्हणूनच खरंच महान आहात तुम्ही पप्पा, खरंच महान आहात तुम्ही पप्पा.                                                - मधू भातकांडे
अशीच असते मैत्री मैत्री व्हायला वय लागत नाही, मैत्री तुटायला वेळ लागत नाही. नाती  जोडायला वेळ लागत नाही, तुटलेली नाती कधी जोडली जाऊ शकत नाही. एक दिवस भांडण झाले. झगडलो तर काय झाले? मनात अजून तीच जगा तुमच्यासाठी आहे. वाईट वाटले, दुःख झाले पण तुमची सोबत गरजेची आहे. अस म्हणतात की झगडत राहणे गरजेचे आहे. झगडल्यानेच  फुलासारखी मैत्री पत्थर बनते. फुलासारखी नाजूक असलेली मैत्री, दगडासारखी मजबूत बनते. मला फक्त एवढंच हवं... एकमेकांची साथ न सोडता, एकमेकांवरचा विश्वास न तोडता, जीवनभर अशीच आमची मैत्री टिकवा, जीवनभर अशीच आमची मैत्री टिकवा.                                                                       - मधू भातकांडे.
आमची मैत्री  आमची मैत्रीच अशा प्रकारे झाली की, तू आणि मी कोणाला काही सांगू सूद्धा शकत नाही. मोकळेपणाने आम्ही बोलू सूद्धा शकत नाही. इतका भोळा तू की, कधी कोणाचे मन दूखवू शकत नाही  आणि, इतका साधा तू की, कोणाशी चूकीचे घडलेले पाहू शकत नाही. तूझ्यासारखा वेडा कधी मला भेटलाच नाही,  दूस्य्रांचा विचार आधी करणारा असा तू, कधी मी पाहिलाच नाही. असा कसा आहेस तू खरच काही समजत नाही. पण, खर सांगायचे तर, तूझ्याविणा आता करमतच नाही.                                           मधू भातकांडे
वाढदिवस  उजेडला तो प्रकाशमय दिवस,  उजेडला तो आनंदाचा दिवस.  ज्या दिवसाची मी एवढी वाट बघायची,  आज आला तो दिवस. जसे बारा वाजायला आले, बहीण-भाऊ, आई-बाबा  कोण करणार पहीलं विश  यावर त्यांचे भांडण लागले. वाॅटसॅप, इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट, संदेश सगळ्यांवरती यायला लागले फटाफट. कधी न संदेश करणाय्रांना,  आली आठवण चटाचट. काय तो दिवस असतो, आपल्या सगळ्या माणसांना आठवण करून देतो.  जगात खूप आहेत आपली माणसं, त्या एकाच दिवशी तसा भास होत असतो. वाटेत भेटणारे, कधी न बोलणारे, आपण कधी भेटतो, याची वाट बघतो. मिठीत घेऊन, हात देऊन  वाढ दिवसाच्या शूभेच्छा देतो. एकच दिवस इतका आनंद देतो, जीवन जगायला एक नवीन आशा देतो.  पण का तो एकच दिवस तसा असतो ?? ह्या वीचारात मन निराश होउन,  तो दिवस पण संपून जातो.                                        मधू भातकांडे