अशीच असते मैत्री

मैत्री व्हायला वय लागत नाही,
मैत्री तुटायला वेळ लागत नाही.
नाती  जोडायला वेळ लागत नाही,
तुटलेली नाती कधी जोडली जाऊ शकत नाही.

एक दिवस भांडण झाले.
झगडलो तर काय झाले?
मनात अजून तीच जगा तुमच्यासाठी आहे.
वाईट वाटले, दुःख झाले पण तुमची सोबत गरजेची आहे.

अस म्हणतात की झगडत राहणे गरजेचे आहे.
झगडल्यानेच  फुलासारखी मैत्री पत्थर बनते.
फुलासारखी नाजूक असलेली मैत्री,
दगडासारखी मजबूत बनते.

मला फक्त एवढंच हवं...
एकमेकांची साथ न सोडता,
एकमेकांवरचा विश्वास न तोडता,
जीवनभर अशीच आमची मैत्री टिकवा,
जीवनभर अशीच आमची मैत्री टिकवा.
                     
                                                - मधू भातकांडे.

Comments