माझे पप्पा


एवढे काम दिवसभर तुम्ही करता,
रात्रंदिवस आमची काळजी तुम्हाला.

आम्ही काय करतो? आई काय करते?
काही कमी तर पडत नाही आम्हाला?
नेहमी याची चिंता तुम्हाला.

दिवसभर उन्हात काम करून येता तुम्ही,
स्वतःचा विचार न करता विदुषका प्रमाणे येता तुम्ही.

स्वतःला कितीही दुःख झाले,
स्वतःला कधीही वाईट  वाटले,
कधीच कळायला देत नाही आम्हाला.

काम जरी नसले, पैसे जरी संपले,
न कळवता पाहिजे ते आणून दिले आम्हाला.

कधी कधी रागाने खूप काही बोलता,
मनाला वाईट वाटते पण समजू शकते मी आम्हाला
दूःखवायचे नसते तूम्हाला.

म्हणूनच खरंच महान आहात तुम्ही पप्पा,
खरंच महान आहात तुम्ही पप्पा.

                                               - मधू भातकांडे

Comments