वाढदिवस 


उजेडला तो प्रकाशमय दिवस, 
उजेडला तो आनंदाचा दिवस. 
ज्या दिवसाची मी एवढी वाट बघायची, 
आज आला तो दिवस.

जसे बारा वाजायला आले,
बहीण-भाऊ, आई-बाबा 
कोण करणार पहीलं विश 
यावर त्यांचे भांडण लागले.

वाॅटसॅप, इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट,
संदेश सगळ्यांवरती यायला लागले फटाफट.
कधी न संदेश करणाय्रांना, 
आली आठवण चटाचट.

काय तो दिवस असतो,
आपल्या सगळ्या माणसांना आठवण करून देतो. 
जगात खूप आहेत आपली माणसं,
त्या एकाच दिवशी तसा भास होत असतो.

वाटेत भेटणारे, कधी न बोलणारे,
आपण कधी भेटतो, याची वाट बघतो.
मिठीत घेऊन, हात देऊन 
वाढ दिवसाच्या शूभेच्छा देतो.

एकच दिवस इतका आनंद देतो,
जीवन जगायला एक नवीन आशा देतो. 
पण का तो एकच दिवस तसा असतो ??
ह्या वीचारात मन निराश होउन, 
तो दिवस पण संपून जातो.

                                       मधू भातकांडे

Comments

Post a Comment