मी आणि तो

मी जशी हसते ,
तसाच हसतो तो.
मी जशी दिसते,
तसाच दिसतो तो.

जेव्हा कधी मन दुःखी असेल,
कोणी जरी नसेल माझ्यापाशी,
तरी तो नेहमी असतो माझ्यासाठी.

विचार काय करता?? 
तो म्हणजे कोण असेल??
तो म्हणजे तोच आहे,
त्याला प्रत्येक माझे गुपित माहित आहे.

घरी आले की केव्हा त्याला भेटते,
आणि सगळं काही केव्‍हा सांगते?
असे माझे मन अस्वस्थ होते.

एवढा विचार नका करू ,
तो जसा आहे तसा कुणीच नाही.
त्याची साथ कधी तुटणारच नाही.
तो म्हणजे माझा प्रिय आरसा आहे.
ज्याच्यामुळे मी माझ्याच प्रतिबिंबकडे बोलू शकते.

                                   - मधू भातकांडे

Comments