जीवन-मरण

जीवन हे असेच असते.
सुखाने आम्ही जगत असलो,
किंवा दुःखाने रडत बसलो,
तरी जगणे हे काय सोडत नसतो.

फुल तसे नेहमी फुलत असते ,
सुकून जाणार हे त्याला माहीत असते ,
तरी ते काही फुलायचे सोडत नसते,
तसेच मनुष्य जगणे हे काय सोडत नसतो.

मरण हे प्रत्येकाच्या जीवनात असते.
मरणाचा विचार करत जगलो तर 
आयुष्य म्हणजे काय आणि 
जीवनाचा अर्थ कधी आम्हाला कळेल काय ?

म्हणूनच मित्र-मैत्रिणींनो, भाऊ-बहिणींनो,
जे काय आहे जसे ते आहे,
त्याच्यामध्ये आनंदाने जगत रहा.
मरणाचा विचार न करता ,
जीवन आपण किती जगलो?
याचा आधी विचार करा.........!!!!

                                     - मधू भातकांडे

Comments

Post a Comment