मी आणि तो मी जशी हसते , तसाच हसतो तो. मी जशी दिसते, तसाच दिसतो तो. जेव्हा कधी मन दुःखी असेल, कोणी जरी नसेल माझ्यापाशी, तरी तो नेहमी असतो माझ्यासाठी. विचार काय करता?? तो म्हणजे कोण असेल?? तो म्हणजे तोच आहे, त्याला प्रत्येक माझे गुपित माहित आहे. घरी आले की केव्हा त्याला भेटते, आणि सगळं काही केव्हा सांगते? असे माझे मन अस्वस्थ होते. एवढा विचार नका करू , तो जसा आहे तसा कुणीच नाही. त्याची साथ कधी तुटणारच नाही. तो म्हणजे माझा प्रिय आरसा आहे. ज्याच्यामुळे मी माझ्याच प्रतिबिंबकडे बोलू शकते. - मधू भातकांडे
Posts
Showing posts from December, 2018
- Get link
- X
- Other Apps
जीवन-मरण जीवन हे असेच असते. सुखाने आम्ही जगत असलो, किंवा दुःखाने रडत बसलो, तरी जगणे हे काय सोडत नसतो. फुल तसे नेहमी फुलत असते , सुकून जाणार हे त्याला माहीत असते , तरी ते काही फुलायचे सोडत नसते, तसेच मनुष्य जगणे हे काय सोडत नसतो. मरण हे प्रत्येकाच्या जीवनात असते. मरणाचा विचार करत जगलो तर आयुष्य म्हणजे काय आणि जीवनाचा अर्थ कधी आम्हाला कळेल काय ? म्हणूनच मित्र-मैत्रिणींनो, भाऊ-बहिणींनो, जे काय आहे जसे ते आहे, त्याच्यामध्ये आनंदाने जगत रहा. मरणाचा विचार न करता , जीवन आपण किती जगलो? याचा आधी विचार करा.........!!!! - मधू भातकांडे